Ad will apear here
Next
‘एमसीई’ सोसायटीतर्फे अभिवादन मिरवणूक


पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिवादन मिरवणुकीचे काढण्यात आली. या मिरवणुकीत १० हजार सर्वधर्मीय विद्यार्थी सहभागी झाले होते.

मिरवणुकीचे उद्घाटन ‘एमसीई’ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले. मिरवणुकीचे हे १५ वे वर्ष होते. या मिरवणुकीत संस्थेच्या ३० आस्थापनांतील १० हजार अल्पसंख्याक, सर्वधर्मीय विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. दरबार ब्रास बॅंडची दोन पथके, ढोल-ताशांचा मिरवणुकीत समावेश होता. राखीव जागांच्या संदर्भात महात्मा गांधी-डॉ आंबेडकर यांच्यातील ‘पुणे करार’ हा जिवंत देखावा या मिरवणुकीचे आकर्षण ठरला.
 


आझम कॅम्पस येथून मिरवणुकीस प्रारंभ होऊन पुना कॉलेज, गोल्डन ज्युबिली, जुना मोटार स्टँड, पद्मजी पोलीस चौकी, भारत सिनेमा, ए. डी. कॅम्प चौक, मॉडर्न बेकरी चौक, संत नरपतगिरी चौक, वीज वितरण कार्यालय, जिल्हा परिषदमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सांगता झाली.



अवामी महाज या सामाजिक संघटनेतर्फे मिरवणुकीच्या मार्गावर मोफत पाणपोई आणि सरबत वाटप केंद्राची व्यवस्था केली होती. ‘एमसीई’ संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात आणि त्यातून महामानवांचे सामाजिक, शैक्षणिक संदेश प्रसारित केले जातात.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZQZBZ
Similar Posts
‘एमसीई’तर्फे गांधी जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक पुणे : दीडशेव्या जयंतीनिमित्त महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीतर्फे गांधी जयंतीच्या पूर्वदिनी म्हणजेच एक ऑक्टोबरला अभिवादन मिरवणुकीचे आयोजन केले होते. यात ‘एमसीई’ सोसायटीतील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते
आझम कॅम्पसमध्ये २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटी येथे शुक्रवार, २१ जून २०१९ रोजी सकाळी सात वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘एमसीई’ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी दिली.
‘मौलाना आझाद यांचा उशिरा सन्मान झाला’ पुणे : ‘मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठा सहभाग दिला आणि स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणक्षेत्राचा पाया रचला, तरीही त्यांना मरणोत्तर भारतरत्न मिळायला ३० वर्षे लागली आणि हा सन्मान यथोचित न देता घरी पाठवला गेला,’ अशी खंत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या भावाचे नातू पत्रकार फिरोज बख्त अहमद यांनी व्यक्त केली
‘वेदा’तर्फे शिक्षक गौरव पुरस्काराचे वितरण पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाइन अँड आर्ट (वेदा) यांच्या वतीने विविध शाळांचे मुख्याध्यापक व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार २०१९’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार डॉ. दीपक टिळक यांनी प्रदान केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language